Tue. May 17th, 2022

‘अमर जवान ज्योत’ राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन

प्रजासत्ताक दिनापूर्वी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राजधानी दिल्लीमधील इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत आता राष्ट्रीय युद्ध स्मारकावर प्रज्वलित झाली आहे. त्यामुळे सुमारे ५० वर्षांपासून प्रज्वलित असलेली अमर जवान ज्योत आता राष्ट्रीय युद्ध स्मारक ज्योतीमध्ये विलीन झाली आहे.

१९७१मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योत प्रज्वलित करण्यात आली होती. तर १९७२मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमर जवान ज्योतचे उद्घाटन केले होते. तसेच फेब्रुवारी २०१९मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.

‘अमर जवान ज्योत’चा इतिहास

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७२साली अमर जवान ज्योत प्रज्वलित केली.

वर्ष १९७१मध्ये भारत – पाक युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या स्मरणार्थ ही ज्योत तेवत असते.

ज्योतीच्या स्मारकाभोवती ‘अमर जवान’ हे सुवर्णाक्षरात अंकित केले आहे.

प्रजासत्ताक दिनाचे संचलन करण्यापूर्वी या ज्योतीला अभिवादन करण्याची परंपरा आहे.

आता प्रजासत्ताक दिनाचे संचलन राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या अमर जवान ज्योतीपासून सुरु होईल.

राष्ट्रीय युद्ध स्मारक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले.

स्वतंत्र भारतासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय युद्ध स्मारकाची उभारणी.

राष्ट्रीय युद्ध स्मारकात २५ हजार ९४२ सैनिकांची नावे सुवर्णाक्षरात कोरली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २५ फेब्रुवारी २०१९ रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन झाले.

राष्ट्रीय युद्ध स्मारक हे इंडिया गेटच्या पलीकडे चारशे मीटरवर आहे.

राष्ट्रीय युद्ध स्मारक ४० एकर जागेवर उभारलेले आहे.

1 thought on “‘अमर जवान ज्योत’ राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.