CID मधील ‘या’ प्रसिद्ध मालिकेत काम केलेल्या कलाकाराची आत्महत्या

सिनेक्षेत्रातील कलाकारांना काम मिळत नसल्याने किंवा अन्य कारणाने त्यांच्या नैराश्येचं प्रमाण वाढते. यातून आत्महत्येच्या अनेक घटना आपल्या समोर येतात.
दरम्यान बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण सिनेक्षेत्रात खळबळ उडाली आहे. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
कुशल पंजाबीने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
कुशलने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. कुशल एक मॉडेल म्हणून सिनेक्षेत्रात आला. अ माउथफुल ऑफ स्काई या मालिकेतून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते.
त्यानंतर सीआयडी, अदालत, देखो मगर प्यार से, श्श्श… फिर कोई है, सजन रे झूठ मत बोलो, या मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. कुशल पंजाबी झलक दिखला जा 7 मध्येही झळकला होता.
याबरोबरच कुशलने सलमान खान आणि अक्षय कुमारसोबत चित्रपटामध्ये काम केले आहे. अंदाज, काल, सलाम-ए-इश्क या चित्रपटात सहाय्यक कलाकार म्हणून काम केले आहे.
कुशलने 4 वर्षांपूर्वी एका यूरोपीयन मुलीशी लग्न केले होते. त्याला एक मुलगाही आहे.
कुशलच्या मृत्यूची माहिती अभिनेता करणवीर बोहराने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली. कुशल आणि करणवीर अत्यंत जीवलग मित्र होते.