Fri. Sep 25th, 2020

पालीच्या खंडोबा यात्रेला सुरूवात

महाराष्ट्र कर्नाटक मधील बारा बलुतेदार समाजाचे कुलदैवत असणाऱ्या कराडमधील पालीच्या खंडोबा यात्रेला सुरूवात झाली आहे. या यात्रेमध्ये खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात.

यात्रेसाठी सकाळ पासूनच पाली गावात भक्तांची गर्दी होते. या यात्रेत पेंबर गावातून खंडोबा देव विवाह सोहळ्यासाठी नदीपलीकडे असणाऱ्या पाली गावात हत्तीवरुन मानकऱ्यांच्या सोबत जातो. अशी परंपरा असून ट्रँकटरला जोडलेला रथातून देवाला विवाहस्थळी नेण्यात येते. यावेळी भाविक यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करत रथावर भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात. 

यात्रेमध्ये काही लोक मुलांच्या वजना एवढे भंडारे आणि खोबरे उधळून केलेले नवस फेडतात. त्यासाठी मुलांचे वजन करुन भंडारा विक्रीची दुकाने यात्रेत थाटण्यात आली आहेत. देवस्थान,पोलिसांकडुन लाखोंच्या यात्रेचे योग्य नियोजन केल्याने आणि चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे भाविकांना दर्शन घेणे सुलभ होत आहे.

मुख्य विवाह सोहळा सायंकाळी उशीरा पार पडतो. मात्र देव मानकऱ्यासोबत जात असताना भाविक भंडार खोबरे उधळूण दर्शन घेऊन परत फिरतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *