Fri. May 20th, 2022

केजरीवाल आणि Valentine’s Day चं हटके ‘प्रेम’!

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये ‘आप’चं पारडं जड आहे. यावेळीही केजरीवालच मुख्यमंत्री बनण्याची चिन्हं दिसत आहेत. ही निवडणूक जिंकल्यास केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. मात्र अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्रीपद यांचं ‘व्हॅलेंटाईन्स डे’ या दिवसाशी खास नातं आहे.

दिल्ली ‘आप’ (AAP) च्या प्रेमात?

दिल्लीमध्ये जर पुन्हा आपचं सरकार आलं, तर केजरीवाल (Arvind Kejariwal) 14 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

2013 ला 28 डिसेंबर रोजी अरिवंद केजरीवाल पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. त्यावेळी आपने 70 पैकी 28 जागा जिंकल्या होत्या. भाजपने 31 आणि काँग्रेसने 8 जागा जिंकल्या होत्या. आपने काँग्रेसशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केलं. मात्र काही दिवसांतच काँग्रेसशी बेबनाव झाल्यानंतर केजरीवाल यांनी 49 दिवसांत 14 फेब्रुवारी 2014 रोजी राजीनामा दिला होता. तो दिवस Valentine’s Day होता.

त्यानंतर 12 जानेवारी 2015 रोजी दिल्लीत निवडणुका (Delhi Elections) जाहीर झाल्या. तेव्हाच आपचे प्रवक्ते यांनी केजरीवाल बहुमताने निवडून येतील आणि ते दिल्लीचे व्हॅलेंटाईन बनतील, असं विधान केलं होतं. ते विधान शब्दशः खरं ठरलं. 10 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाल्यावर ‘आप’ला 70 पैकी 67 जागांवर यश मिळालं. केजरीवाल यांनी 14 फेब्रुवारी रोजी Valentine’s Day रोजी मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली.

2020 च्या निवडणुकांतही ‘आप’ यशाकडे घोडदौड करत आहे. जर आपचा पुन्हा विजय झाला, तर केजरीवाल पुन्हा 14 फेब्रुवारी रोजीच शपथ घेण्याची शक्यता आहे. म्हणजेच केजरीवाल यांचं Valentine’s Day शी असणारं अनोखं नातं पुन्हा दिसून येऊ शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.