Wed. Jan 19th, 2022

ओमायक्रॉनचा धोका मात्र डोंबिवलीकर बेफिकीर

मुंबईमधील कल्याण-डोंबिवली येथे ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. महाराष्ट्रातील पहिला रुग्ण डोंबिवलीमध्ये सापडल्याने आरोग्यविभागाची चिंता वाढली आहे. देशात ओमायक्रॉनची संख्या वाढत असून डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा विषाणू सापडला आहे, मात्र तरिही डोंबिवलीकर बेफिकिर असल्याचे चित्र दिसत आहे.

डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्यामुळे सुजाण नागरिक कोरोनाचे नियम पाळताना दिसत आहेत. मात्र काही नागरिक बिनधास्तपणे वावरताना आहेत. डोंबिवलीमध्ये गर्दीच्या ठिकाणी नागरिक विना मास्क फिरत आहेत. बाजारांमध्ये खरेदी करताना, रेल्वेने प्रवास करताना नागरिकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे ओमायक्रॉनचा रुग्ण सापडला असला तरिही डोंबिवलीकर बेफिकीर असल्याचे चित्र दिसत आहे.

ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता, नागरिकांनी काळजी घेत सावधानता बाळगली पाहिजे, असे आवाहन महापालिका आयुक्त करत आहेत. गर्दी टाळणे, मास्क वापरणे, कोरोना नियम पाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

राज्यात आठ ओमायक्रॉनचे रुग्ण 

महाराष्ट्रातील मुंबई येथील कल्याण-डोंबिवलीमध्ये एका नागिरकाला ओमायक्रॉन विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एक ओमायक्रॉन विषाणूचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत वाढ झाली असून ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता आठवर पोहचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *