Mon. Jan 17th, 2022

चालकाने ट्रॅक्टरला लावल्या तब्बल 11 ट्रोल्या ; प्रशासनाचे दुर्लक्ष

सध्या ऊस हंगाम सर्वत्र सुरू असून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरही रस्त्यावर दिसत आहेत. मात्र कोल्हापूरमध्ये एका ट्रॅक्टरची चर्चा सुरू आहे.

या ट्रॅक्टरच्या मालकाने ट्रॅक्टरला चक्क एका पाठोपाठ अशा तब्बल 11 ट्रोल्या लावल्या. यामुळे ट्रॅक्टरचा मालक चांगलाच चर्चेत आला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

कर्नाटकमधील संकेश्वरमधील हा ट्रॅक्टर आहे. हा ट्रॅक्टर अनोखा असून त्याला तब्बल 11 ट्रॉली लावून ऊस वाहतूक सुरू केली आहे.

वाहतुकीचे सर्व नियम पायदळी तुडवत या ट्रॅक्टरने प्रवास सुरू केला आहे. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

तर दुसऱ्या बाजूला वळणावर योग्यरित्या ही ट्रॅक्टर ट्रेन हाताळणाऱ्या ड्रायव्हरचे मात्र कौतुक केले जात आहे. या व्हिडिओची चर्चा सध्या कर्नाटक राज्यात जोरदार सुरू असून प्रत्येक जण हा ट्रॅक्टर ट्रेन बघून अवाक् झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *