Jaimaharashtra news

चक्क ‘या’ चित्रपटाच्या अभिनेत्यालाच मारहाण, प्रकृती गंभीर

देशात एखादा चित्रपट त्याच्या चित्रीकरणाच्या प्रश्नावरून वादाच्या भोवऱ्यात सापडतो. यामुळे अनेक वेळा त्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जाते. मात्र ही मागणी मान्य न झाल्यास सामान्य जनताच आक्रमक होऊन चित्रपटातील व्यक्तींवर हल्ला करतात.

त्यांना मारहाण केल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. दरम्यान बीडमध्येही असाच प्रकार घडला आहे. बीडमधीस लोकांनी चक्क चित्रपटाच्या अभिनेत्याला मारहाण केली आहे.

बायको देता का बायको या चित्रपटाच्या अभिनेत्याला बीड मध्ये बेदम मारहाण करण्यात आली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता बीडच्या आशा टॉकीज मध्ये आला होता. त्यावेळी 15 ते 20 तरुणांनी अभिनेता सुरेश थांगे याला बेदम मारहाण केली आहे.

चित्रपटातील अभिनेत्याला मारहाण सुरू होताच अभिनेत्री श्वेता कुलकर्णी यांनी बचावासाठी तेथून पलायन केले. त्यामुळे या हल्ल्यातून अभिनेत्री बचावली आहे. मारहाण झालेला अभिनेता गंभीर जखमी असून जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे.

मात्र, मारहाण कोणी केली आणि कोणत्या कारणामुळे केली. या संदर्भात माहिती अजून पुढे आलेली नाही. दरम्यान या चित्रपटातून शेतकरी पुत्राची बदनामी होत असल्याची चर्चा परिसरात होती. त्यामुळे हा हल्ला शेतकरी पुत्रांनी एकत्र येऊन केल्याचा प्राथमिक अंदाज दर्शवला आहे.

Exit mobile version