Sun. Jul 5th, 2020

पदभार स्वीकारताच मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ काम

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी आपल्या कामाची दणक्यात सुरुवात केली.

फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या धनादेशावर सही करुन केली. हा 1 लाख 20 हजारांचा चेक मुख्यमंत्र्यांनी आपल्या हस्ते श्रीमती कुसूम वेंगुर्लेकर यांना सूपूर्त केला. वेंगुर्लेकर यांच्यावर धन्वंतरी रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरु आहेत.

उपचारावरील खर्चासाठी कुसूम वेंगुर्लेकर यांनी सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात अर्ज केला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्तपरतेने कुसुम वेंगुर्लेरांच्या अर्जावर कार्यवाही करत आपल्या हस्ते धनादेश सुपूर्त केला.

यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील अनेक गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे आर्थिक मदत केली जाते.

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी राजवट लागू झाली होती. त्यामुळे मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद पडले होते. त्यामुळे राज्यातील अनेक गरजु रुग्णांना आर्थिक मदतीला मुकावे लागले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *