विदर्भात उष्णतेची लाट…नागरिकांची लाहीलाही
जय महाराष्ट्र न्युज, विदर्भ
विदर्भात उन्हाच्या झळ सर्वात जास्त जाणवत आहै. आत्ताच नागपूरचं तापमान 45अंश सेल्सिअसच्या आसपास पोहचलं आहे. त्यामुळे विदर्भात उन्हाने लाहीलाही झाली आहे. येत्या 3 तारखेपर्यंत तापमान 46अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज नागपूर हवामान खात्यानं वर्तविला आहे. उत्तरेकडून मोठ्या प्रमाणात येणारे गरम वारे आणि बंगालच्या खाडीतून येणारे मोरेश्वर कमी झाल्यानं तापमानात मोठी वाढ झाली आहे.
तसंच गरम वाऱ्यामुळे वातावरण कोरडं झाले असून त्याचा त्रास मात्र सामान्य नागरिकांना आणि पक्ष्यांना सोसावा लागत आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम मोठ्या प्रमाणात होत असल्यानं या काळात नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतं आहे.