कटई ते ऐरोली दरम्यानचा प्रवास होणार सुखकर

ऐरोली ते कटाई प्रवास करण्यासाठी प्रवाशांची मोठी वाहतूक कोंडी होत असे. मात्र आता ऐरोली ते कटाई उन्नती मुक्त मार्गाच्या माध्यमातून हा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. कल्याण-डोंबिवली येथून ठाण्याला येण्यासाठी १२ किलोमीटराच वेढा मारून यावा लागत होता. त्यामुळे प्रवाशांना अधिकचे अंतर कापावे लागत होते. मात्र, आता या बोगद्याच्या कामामुळे अवघ्या १.७ किमी अंतरात प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. यामुळे प्रवाशांची वेळेची बचत होणार असून अवघ्या १० मिनिटात हा प्रवास होणार आहे. या बोगद्यासाठी एकूण २३७ कोटींचा खर्च करण्यात आला असून संपूर्ण प्रकल्प १०४० कोटींचा असणार आहे. या प्रकल्पाची पाहणी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.
Hey I haven’t discovered a site like yours in forever. Thanks for keeping sites like this alive. I saved this page to my bookmarks. I’ll be back