Mon. Jan 17th, 2022

देहूच्या मुख्य मंदिरात संत तुकाराम महाराजांचे शेवटचे उभे रिंगण संपन्न

देहू: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा शेवटचे उभे रिंगण  आज तुकाराम महाराजांच्या देहू येथील मुख्य मंदिरात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पार पडला. यावेळी टाळगाव चिखली येथील दत्तात्रय कोंडीबा मळेकर यांच्या अश्वाला उभे रिंगण सोहळ्याचा मान मिळाला. पायी वारी सोहळा असताना हे रिंगण वाखरी बाजीराव विहीर येथे पार पडते. मात्र कोरोना मुळे हे रिंगण देहूच्या मुख्य मंदिरात पार पडले.

यावेळी प्रथम पताकावाले झेंडेकरी, नंतर तुळस व हंडा घेतलेल्या महिला, टाळकरी, विणेकरी यांनी रिंगण पूर्ण केल्यानंतर मानाच्या अश्वाने रिंगण पूर्ण केले. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात भाविकांनी झिम्मा, फुगड्या, मानवी मनोरे आदी खेळांचा आनंद लुटला. यावेळी तुकोबा माऊलीचा जयघोषात अवघी देहू नगरी दुमदुमून गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *