Wed. Sep 23rd, 2020

“असं” असेल कंकणाकृती सूर्यग्रहण

भारतात 26 डिसेंबरला यावर्षीचे शेवटचे सुर्यग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण कंकणाकृती स्वरूपाचे असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सुर्यग्रहणाचे अनेक प्रकार आहेत. आता कंकणाकृती ग्रहण म्हणजे नेमके कसे असेल ? ते कसे पाहता येईल ? हे प्रश्न नक्कीच सर्वांना पडले असणार.

कंकणाकृती ग्रहण म्हणजे काय ?

जेव्हा सुर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत तसेच एकाच प्रतलात येतात. त्यामुळे चंद्राची गडद सीवली पृथ्वीवर पडते. नंतर पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यामुळे हि सावली जमिनीवरून प्रवास करते. या प्रवासात येणाऱ्या भागांवर कंकणाकृती सुर्यग्रहण तयार होते.

हि सावली गोलाकार स्वरूपाची असल्याने त्याला कंकणाकृती सुर्यग्रहण म्हणतात. यामुळे काही काळ सुर्य नाहीसा होतो.

नेमके कधी असेल कंकणाकृती ग्रहण ?

डिसेंबर महिन्याच्या 26 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून या ग्रहणाला सुरूवात होईल. याआधी 8 वाजता भारतात खंडग्रास सुर्यग्रहण असण्याची शक्यता दर्शवली आहे. त्यानंतर 9.06 मिनीटांनी कंकणाकृती ग्रहण दिसेल. हे ग्रहण दुपारी 12 वाजून 29 मिनीटांनी संपेल.  

भारतात हे ग्रहण हि कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यातच दिसणार आहे.

दरम्यान कंकणाकृती ग्रहण यानंतर 21 जून 2020 ला दिसणार असल्याची दर्शवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *