Sun. Apr 5th, 2020

दिव्यांग आंदोलकांनी प्रवेशव्दार अडवल्याने महापौर गेले रिक्षाने घरी

राज्यातील दिव्यांगासाठी शासनाने अनेक योजना दिल्या आहेत. मात्र राज्यात अनेक ठिकाणी या योजना पोहचत नाहीत. यामुळे त्या योजनेचा दिव्यांगाना लाभ घेता येत नाही. यामुळे राज्यात सरकार विरोधात दिव्यांग मोर्चे काढतात.

त्यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी निदर्शने घडवून आणतात. मात्र याचा अधिकाऱ्यांना काही फरक पडत नाही. अशा अनेक घटना समोर येतात.

दरम्यान औरंगाबाद महानगर पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर दिव्यांग आंदोलकांनी रस्ता अडवून आंदोलन केले. यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांना आपली कार सोडून रिक्षाने जाण्याची वेळ आली.

अपंगांसाठी असलेला निधी मिळावा यासाठी गेल्या वर्षभरापासून दिव्यांग महानगरपालिकेच्या खेट्या मारत होते. शासनातर्फे देण्यात येणारा अपंग निधी मिळत नसल्याने आंदोलकांनी रस्ता न सोडण्याचा निर्धार केला.

यामुळे महापौरांसह अनेक नगरसेवकांवर पायी जाण्याची वेळ आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *