Fri. Jul 30th, 2021

निर्दयीपणाचा कळस ! बाळाला रुग्णालयातच टाकून आईने काढला पळ

मुलांना जन्म देऊन त्यांनी निर्जन स्थळी टाकून पळ काढल्याच्या अनेक घटना समोर येतात. तसेच रूग्णालयात मुलांना टाकून काही पालक पळ काढतात. यामुळे त्या निष्पाप बाळांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अनेकदा अशी बाळं दगावतात.

दरम्यान चंद्रपुरमधील अशीच एक घटना उघडकीस झाली आहे. नवजात मुलीला सोडून आईने पळ काढल्याने चंद्रपुर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

शनिवारी दुपारच्या सुमाराला सात दिवसाच्या मुलीला घेऊन दोन महिला रुग्णालयात आल्या होत्या. एकीच्या हातात बाळ होते. त्या मेडीसीन वॉर्डात पोहचल्या. तिथे एक व्यक्ती उभी होती.

औषध घेण्याच्या बहाण्याने एक महिला तेथून निघून गेली. जवळपास अर्ध्या तासाचा कालावधी उलटला परंतु ती महिला परतली नाही.

याकाळात तिच्या सोबतच्या महिलेने एका व्यक्तीशी ओळख केली. गेलेली सोबतीण परत आली नाही म्हणून तीला बघून येते असे सांगून जवळचे बाळ त्या व्यक्तीजवळ दिले आणि निघून गेली.

बराच वेळ झाला त्यानंतर सुद्धा दोन्ही महिला परतल्या नाही. त्यामुळे शेवटी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिस तात्काळ रुग्णालयात पोहचले आणि मुलीला ताब्यात घेतले.

सध्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुलीच्या आईचा शोध पोलिस घेत आहेत. या रुग्णालयात सीसीटीव्ही नसल्यामुळे असे प्रकार येथे वारंवार होत असतात असं पोलिसांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *