Thu. Apr 22nd, 2021

#VotingRound2 : बोहल्यावर चढण्याआधी नववधूने बजावला मतदानाचा हक्क

लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात आज 10 लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे.सकाळी 7 वाजता पासून ते सायंकाळी 6 च्या दरम्यान हे मतदान होणार आहे.यात महाराष्ट्रामध्ये विदर्भातील ३, मराठवाड्यातील 6 आणि पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर अशा दहा जागांवर या मतदानासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा देखील सज्ज आहे.दुसऱ्या टप्यातल्या अमरावती लोकसभा मतदार संघात मतदानाला सुरवात झाली असून अमरावती येथील एका नववधूने लग्न मंडपात लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.लग्नाच्या आधी भावना जाधव या नववधूने मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्साहात आपला सहभाग नोंदविला.

नववधूने बजावला मतदानाचा हक्क

लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात आज 10 लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे.

महाराष्ट्रामध्ये विदर्भातील ३, मराठवाड्यातील 6 आणि पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर अशा दहा जागांवर मतदान होत आहे.

अमरावती येथील एका नववधूने लग्न मंडपात लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावला आहे.

लग्नाआधी भावना जाधव या नववधूने मतदानाचा हक्क बजावला आहे.

लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्साहात आपला सहभाग नोंदवल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *