Tue. Jul 14th, 2020

नागपूरमध्ये दर तासाला धावणार मेट्रो

नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी ते खापरी या मार्गाला CMRS कडून प्रमाणपत्र मिळाल्याने मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या फेऱ्यांना उद्यापासून सुरूवात होणार आहे. ही नागपूर मेट्रो दर तासाने  धावणार असून याचे नवे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे.

हे आहे नवे वेळापत्रक ?

नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी ते खापरी या मार्गाला CMRS कडून प्रमाणपत्र मिळालं आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्याने मेट्रोच्या फेऱ्यामध्ये वाढ होणाच्या मार्ग मोकळा झाला आहे.

या फेऱ्यांना उद्या पासून सुरूवात होणार आहे. ही नागपूर मेट्रो दर तासाने मेट्रो धावणार आहे. याचे नवे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे.

CMRS यांच्या चमूने 19 आणि 20 जून रोजी महामेट्रोनागपूर प्रकल्पाची पाहणी केली होती. या पाहणीनंतर अप मार्गाकरिता CMRSचे प्रमाणपत्र देखील महा मेट्रोने मिळवले.

या मेट्रोच्या अप आणि डाउन मार्गाच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी फक्त डाउन मार्गावर मेट्रोची सेवा सुरू होती.मात्र आता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अप मार्गावरील ट्रॅकची लांबी वाढली आहे. त्यामुळे आता फेऱ्या वाढविणे शक्य झाले असल्याचे महा मेट्रोकडून सांगण्यात आले.

मेट्रोचे नवे वेळापत्रक (दर तासाला मेट्रो)
डाउन लाइन

स्टेशन : पहिली फेरी : शेवटची फेरी
खापरी स्टेशन : सकाळी ८ : रात्री ८
न्यू एअरपोर्ट : सकाळी ८.८ : रात्री ८.८
एअरपोर्ट साउथ : सकाळी ८.१५ : रात्री ८.१५
एअरपोर्ट : सकाळी ८.१९ : रात्री ८.१९
सीताबर्डी : सकाळी ८.४९ : रात्री ८.४९

मेट्रोचे नवे वेळापत्रक (दर तासाला मेट्रो)
अप लाइन

स्टेशन : पहिली फेरी : शेवटची फेरी
सीताबर्डी : सकाळी ८ : सायंकाळी ७
एअरपोर्ट : सकाळी ८.३० : सायंकाळी ७.३०
एअरपोर्ट साउथ : सकाळी ८.३४ : सायंकाळी ७.३४
न्यू एअरपोर्ट : सकाळी ८.४० : सायंकाळी ७.४०
खापरी : सकाळी ८.४९ : सायंकाळी : ७.४९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *