Sat. May 15th, 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीला यश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीला यश मिळत असून कोरोनाच्या लढाईत भारताला तब्ब्ल ४० देशांकडून मदत मिळणार आहे. भारताला कोरोनाविरुद्धच्या लढाईत जगाचे पाठबळ मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुसंसवादामुळे कोरोनाच्या संकटात जग भारताच्या पाठीशी उभे राहिले आहे. परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रीगला यांनी याबाबत तपशीलवार माहिती दिली आहे. फ्रांस, जर्मनी, आयर्लंड, स्विझर्लंड, बहारीन, कतार, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मॉरिशस, बांगलादेश आणि भूतान यांच्याकडून मदतीचा ओघ सुरु असल्याचं त्यांनी यामध्ये म्हटलं आहे.
भारताला तातडीने लागणाऱ्या वैद्यकीय सुविधा भारतात येऊ लागल्या आहेत.त्या काय आहेत ते पाहूया!
  • रशियाकडून २० ऑक्सिजन प्लांट आणि काही व्हेंटीलेटर्स, फावीपीरॅवीर विमानाने पोहचले.
  • अमेरिकेकडून लशीचा कच्चामाल, ११०० ऑक्सिजन सिलेंडर, १७०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, दीड कोटी एन-९५ मास्क, १० लाख कोरोना चाचण्या साधने, २० हजार रेमेडिसिवीर मिळणार आहेत.
  • अमेरिकेच्या गिलेड सायन्सेसकडून साडेचार लाख रेमेडिसिवीर मिळणार आहेत.
  • स्वित्झर्लंड आणि जर्मनीकडून टॉसिलीझूम्याब औषधाचा पुरवठा करण्यात येणार आहे
  • इजिप्त, बांगलादेश आणि यूएईकडूनही रेमेडिसिवीरचा पुरवठा करण्यात येणार आहे.
  • संयुक्त अरब अमिरातीकडून १४० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन मिळणार आहे
  • बहारीनकडून ४० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन मिळणार आहे.
  • कुवेतकडून १८५ लिक्विड ऑक्सिजन आणि एक हजार ऑक्सिजन सिलेंडर मिळणार आहे.
अशा प्रकारे कोरोनाच्या लढाईत भारताला ४० देशांकडून मदत मिळत आहे.  ५५० ऑक्सिजन प्लांट्स, ४ हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, १० हजार ऑक्सिजन सिलेंडर्स आणि १७ क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स भारतात पोहचणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *