Thu. Dec 12th, 2019

केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांंच्या घरी चोरी, महत्त्वाची कागदपत्रे जप्त

पीयुष गोयल यांच्या घरात गेल्या महिन्यातच चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी सांगितली.

चक्क देशाचे केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याच घरी चोरी झाल्याचे समोर आले आहे. हे ऐकल्यानंतर नक्कीच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र त्यांच्या मुंबईतल्या घरी चोरी झाली असून, त्यांच्या घरीच काम करणाऱ्या नोकराने ही चोरी केल्याचं समोर आलं आहे. यादरम्यान पोलिसांनी तातडीने कारवाई करत चोराला अटक केलं आहे. पोलिसांनी चोरांकडून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

पीयुष गोयल यांच्या घरात गेल्या महिन्यातच चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी सांगितली.

घरातल्या वस्तू आणि चांदीची भांडी गायब झाल्याचं पियुष गोयल यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी लगेचच याबाबतीत तक्रार दाखल करण्यात आली.

सप्टेंबर महिन्यात ही घटना घडली असून, तक्रार दाखल करताच आरोपी विष्णुकुमार विश्वकर्मा याला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी त्याच्याकडून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली असून मोबाईल सायबर सेलकडे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.

यासबंधात त्याचे मेल देखील तपासले जात आहेत. पोलिसांनी असे देखील सांगितले की, हा नोकर पियुष गोयल यांच्याकडे गेल्या तीन वर्षापासून काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *