Wed. Sep 23rd, 2020

शेतकऱ्याच्या ‘अशा’ गोष्टीची चोरी, ज्यासाठी कोर्टाने दिले CID ला आदेश

जगात अनेक चोरीच्या घटना आपण पाहतो. पैसे, दागिने, मौल्यवान वस्तू अशा काही गोष्टींच्या चोरीच्या घटना घडतात. अगदी चोरीचे काही चित्रपटही पाहिले असतील. पण एका अशा चोरीची बातमी आहे की ज्याची कल्पनाही करू शकणार नाही. या चोरीची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण (CID) विभाग करणार आहे.

अशी कोणती चोरी झाली आहे नेमकी?

2018 मध्ये राजगड पोलीस ठाण्यात शेतातली माती चोरीला गेल्याची तक्रार देण्यात आली होती.

सर्जेराव कोळपे या शेतकऱ्याच्या (farmer) शेतातील संपूर्ण माती रात्रीत लंपास करण्यात आली होती.

चौकशी दरम्यान बंधाऱ्याच्या कामासाठी शेतकऱ्याला न सांगता आणि  परवानगी न घेता संपूर्ण शेतातील माती उकरून नेण्यात आली.

या प्रकरणी कोळपे कुटुंबाने पोलीस स्टेशन, पंचायत समिती, पाटबंधारे विभाग, तहसील कार्यालय आशा सगळ्या शासकीय कार्यालयात  दाद मागितली पण हाती काही आले नाही.

शेवटी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयाने माती चोरी प्रकरणी CID चे आदेश दिले आहेत.

या संपूर्ण माती चोरी प्रकरणी उच्च न्यायालयात संबंधित अधिकाऱ्यांच्या  चुका आणि कोळपे परिवाराला दिलेली वागणूक न्यायालयात मांडण्यात आली.

त्यावरून CID चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

एखाद्या गंभीर बाबीच्या तपास कामासाठी CID चौकशीची मागणी केली जाते, परंतु राज्यात पहिल्यांदाच शेतीतील माती चोरी प्रकरणी अशी चौकशी होणार आहे. त्यामुळे गुन्हा करणाऱ्यांसाठी ‘ कानून के हाथ लंबे होते है’ एवढचं म्हणावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *