Mon. Jan 17th, 2022

राज्यात ११ हजारांहून अधिक मृत्यूंची नोंदच नाही

महाराष्ट्र: कोरोनाने महाराष्ट्रात आतापर्यंत एक लाखांहून अधिक जणांचे मृत्यू झाले असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात ही संख्या त्याहून अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मृतांच्या संख्येची माहिती देणाऱ्या पोर्टलवर अतिरिक्त ११ हजार ६१७ मृत्यूंची नोंद अद्याप झालेली नसून, ती येत्या दोन दिवसांत करण्याचा आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी दिला आहे. नोंदी न झाल्यास संबंधित जिल्हा शल्यचिकित्सकांना कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

नोंदी पूर्ण झाल्यानंतर राज्यातील मृतांच्या संख्येत किमान दहा टक्के वाढ होणार आहे. संबंधित जिल्ह्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील ‘अनरिपोर्टेड डेथ’च्या राहिलेल्या नोंदी १० जूनपर्यंत तत्काळ पोर्टलवर अद्ययावत कराव्यात, असा आदेश राज्याचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिले आहेत.

राज्यातील नोंद नसलेल्या मृत्यूंची जिल्हानिहाय संख्या

मुंबई- १६०४

नाशिक- ४२७

पुणे- ५७६८

कोल्हापूर- ४१

औरंगाबाद- १०८६

लातूर- ८१

अकोला- ८३५

नागपूर- १८९३

अन्य- ११८

एकूण- ११,६१७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *