Wed. Aug 5th, 2020

इथं मिळतोय चोरी करण्यासाठी ‘पगार’

एकीकडे पगारी नोकरांंना नोकरीवरून कमी करत आहेत  तर दुसरीकडे नवनवीन व्यवसाय करणाऱ्यांमध्ये वाढ होत आहे. त्यातीलच एक व्यवसाय म्हणजे पगार घेऊन चोरी करणे.

एकीकडे पगारी नोकरांंना नोकरीवरून कमी करत आहेत  तर दुसरीकडे नवनवीन व्यवसाय करणाऱ्यांमध्ये वाढ होत आहे. नागपूरमध्ये  चोरी करण्याचा नवीन व्यवसाय सुरू करण्यात आला आहे.  नागपूरमध्ये पगार घेऊन  चोरी केली जात आहे.  त्यामुळे सगळेच चकित झाले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण ? 

बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करणारी एक टोळी नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून फिरत होती. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी नेताजी मार्केट भागातून आफताब इब्ररार अन्सारी याला अटक केलं. पोलिसांचा मार खाल्यांनंतर आफताब अन्सारीनं मोबाईल चोरीची कबुली दिली.

सोबतच झारखंडहून मोबाईल चोरीसाठी नागपुरात आलेल्या आठ चोरांची नावंही त्यानं सांगितली. चोरलेले मोबाईल ही टोळी झारखंडला पाठवायची आणि तिथून बांग्लादेशला त्यांची तस्करी केली जायची. कारण या टोळीचा म्होरक्या झारखंडला असतो. तो मोबाईल चोरी करण्यासाठी या चोरांना कामानुसार पगार देतो. तसंच नागपूर शहरात या चोरांना पाठवल्यांतर पगाराबरोबरच त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही हा म्होरक्या करायचा.

झारखंडची ही टोळी नागपुरात खास मोबाईल चोरी करण्यासाठी आणण्यात आली होती. त्यासाठी त्यांनी जोगीनगर इथे रुमही भाड्यानं घेतली होती. सहा चोरांसह दोघा अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून १ लाख २१ हजारांचे आठ मोबाईल  जप्त केले आहेत. झारखंडच्या टोळीतल्या या चोरांना कामानुसार पाच हजार ते पंधरा हजारांपर्यंत मोबदला पगार स्वरुपात मिळत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *