Thu. Apr 22nd, 2021

तिसरी टाटा एल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा पार

तिसरी टाटा एल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच पार पडली. लोणावळ्याच्या आल्हाददायक वातावरणात ही स्पर्धा पार पडली.

भल्या पहाटे सुरू झालेली स्पर्धा दुपारी संपली. यंदा 50 आणि 35 किमीचे टप्पे या स्पर्धेत ठेवण्यात आले होते. या गाजलेल्या स्पर्धेसाठी दरवर्षीप्रमाणं यंदाही स्पर्धकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

एकूण 1400 धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या १४०० पैकी २०० धावपटू या महिला होत्या.

दोन्ही प्रकारात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यात महिलांनीही हिररीनं आपापला सहभाग नोंदवला.

लोणावळ्याच्या सुप्रसिद्ध वँक्स म्यूझियमपासून या स्पर्धेची सुरूवात झाली. तर जावर गावात ही स्पर्धा संपली.

धावपटूंचे मनोबल वाढवण्यासाठी लोणावळेकरदेखील या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

शिवाय बाल-गोपाळ, तरूण-तरूणी मोठ्या संख्येनं आवर्जून हजर होते. नीटनेटक्या स्पर्धेच्या आयोजनामुळं स्पर्धकांसह उपस्थितांनीही भरभरून या उपक्रमाला दाद दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *