Mon. Jan 17th, 2022

‘या’ कारणास्तव श्रुती हसन व्हिस्कीच्या आहारी

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांची मुलगी अभिनेत्री श्रुती हसन तिच्या एका मुलाखतीमुळे आता सध्या चर्चेत आली आहे.

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांची मुलगी अभिनेत्री श्रुती हसन तिच्या एका मुलाखतीमुळे आता सध्या चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये तिने आपल्या खासगी जीवनाबद्दल काही खुलासे केले आहेत. प्रियकरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती पहिल्यांदाच त्यावर मोकळेपणाने व्यक्त झाली आहे. त्याबरोबर तिन तिच्या दारुच्या व्यसनाबाबत खुलासा केला आहे.

“मी व्हिस्कीच्या इतक्या आहारी गेले होते की, त्याचा परिणाम माझ्या करिअरवरही होऊ लागला होता. हे व्यसन नंतर इतकं वाढल की, मला अभिनयातून ब्रेक घ्यावा लागला होता”. असे तिने फीट अप विथ स्टार्स या चॅट शोमध्ये सांगितल आहे.

काही दिवसापूर्वी तिची तब्येत ही बिघडली होती आणि हे दारुच्या अतिसेवनामुळेच झाल्याचं तिने सांगितलं. गेल्या वर्षी पूर्णपणे व्यसन मुक्त झाल्याचे श्रुतीने सांगितले आहे. काही महिन्यापूर्वीच तिचा ब्रेकअप झाला होता, “मला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप नाही. माझ्यासाठी तो एक चांगला अनुभव होता. त्यातून मी खूप काही शिकले.” असे तिने ब्रेकअपबद्दल सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *