…”यामुळे” ठरला वसई कार्निवल लक्षणीय

संपूर्ण देशात आज मोठ्या उत्साहात नाताळ साजरा होत आहे. वसईतही मोठ्या प्रमाणात नाताळचा उत्साह पहायला मिळाला. त्यातच वसईमध्ये होणारा कार्निवल हा मोठा लक्षणीय ठरतो.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हा कार्निवल वसईच्या प्रत्येक गावात पार पडला. यामध्ये पारंपरिक पोषाख करुन तरुणाईने सहभाग होता.
नाताळसाठी वसईतील बाजारपेठा सजल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, बेल्स, आकाशकंदिल आणि सजावटीचे साहित्य विक्रीस ठेवले होते.
भेटवस्तू आणि येशूच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी तसेच सांताक्लॉजचा पोषाख खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती.
नाताळमध्ये केकला जास्त पसंती असल्याने केकचे अनेक स्वाद आणि वेगवेगळ्या स्टाईलचे केक या कार्निवलमध्ये पहायला मिळाले. तसेच विविध खाद्यपदार्थांना विशेष मागणी यामध्ये होती.
नाताळ आणि नवीन वर्षाचं स्वागतासाठी वसईचा पश्चिम समुद्रकिनारा सज्ज झाला आहे. मुंबई आणि परिसरातून हजारो पर्यटकांची उपस्थिती वसईमध्ये पहायला मिळाली. यामुळे येथील रिसॉर्ट, हॉटेल्स, लॉजच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला.