Tue. Sep 28th, 2021

अंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालंय. मात्र तरीही सुशांतचे फॅन्स आणि अंकित हे नेहमीच सुशांतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. सुशांतने या जगाचा निरोप घेतला असला तरी आजही तो त्याच्या चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून त्याला प्रसिद्ध मिळाली. या मालिकेतून तो घराघरात पोहचला. छोट्या पडद्यावर जितकी सुशांतला लोकप्रियता मिळाली तितकीच लोकप्रियता सुशांतला त्याच्या बॉलिवूड चित्रपटांच्या माध्यमातून मिळाली होती. सुशांतचं चाहत्यांसोबतही घट्ट नातं निर्माण झालं होत. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेदरम्यान त्याचं आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेचं देखील प्रेमाच नात जुळलं होतं. सुशांत आणि अंकिता हे ६ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. सुशांतच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या घरी हवन ठेवल्याचं लक्षात येतंय. अंकिताने तिच्या इन्स्टास्टोरीला एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात एक हवन कुंड दिसत असून देवासमोर दिवा उजळत असल्याचं पाहायला मिळत आहे. अंकिताने दोन व्हिडीओ शेअर करत सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच अंकिताने सुशांतसोबत व्यतीत केलेल्या खास क्षणांचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओत अंकिता आणि सुशांतचे अनेक क्यूट फोटो पाहायला मिळत आहेत. “असा होता आमचा प्रवास!!! फिर मिलेंगे चलते चलते” असं खास कॅप्शन अंकिताने या व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक कलाकारांसोबतच सुशांतचे चाहते भावूक झाले आहेत. अकिंता लोखंडे सध्या विकी जैनला डेट करत असूनही अंकित नेहमी सुशांतसोबत असलेल्या नात्याबद्दल जाहीरपणे बोलताना दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *