‘या’ वेबसाईटवर मिळते भारतातील Corona चे संशयित, रुग्ण, मृत्यू, संदर्भात योग्य महिती

Corona Virus मुळे सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी तसंच अफवा कमी करण्याच्या हेतून एक Website तयार करण्यात आली आहे.
https://covidout.in या वेबसाईटवर कोरोना बाधितांची संख्या, कोरोना संशयितांची संख्या, मृतांची संख्या, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांची संख्या अशा सर्व प्रकारची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. या संकेतस्थळावर कोरोना संदर्भात राज्यनिहाय स्थितीही जाणून घेता येणार आहे.