Fri. Feb 21st, 2020

सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या टाकीत कामगार अडकले; तीन कामगारांचा मृत्यू

ठाण्यातील ढोकाळी नाका येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील टाकीत अडकून तीन कामगरांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रेसिडन्सी लक्झेरिया येथील मैदानात सांडपाणी प्रक्रिया केंद्रात आठ कामगार साफसफाईसाठी उतरले होते. यावेळी हे आठही कामगार सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील टाकीत अडकले. अग्निशमन दलाला माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर दोन तासांनी या आठही कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं ?

ठाण्यातील ढोकळी नाका येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील टाकीत अडकल्याची घटना घडली.

प्रेसिडन्सी लक्झेरिया येथील मैदानात सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या टाकीत आठ कामगार साफसफाईसाठी उतरले होते.

काम सुरू असताना ते टाकीत अडकल्याचे त्यांना समजले.

अग्निशमन दलाच्या सहाय्याने या आठही कामगारांना बाहेर काढण्यात आले.

टाकीतून बाहेर काढल्यानंतर तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना घडली.

आग्निशमन दलाच्या दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या कामगारांना बाहेर काढण्यात यश मिळाले.

यामध्ये इतर पाच कामगार जखमी झाले आहे.

पाच जखमी कामगार –

विजेंद्र हटवाल ( 25 )

मंज्जित वैदय ( 25 )

जसबिर पुहाल ( 24 )

रुमेर पुहाल ( 30 )

अजय पुहाल या कामगाराला  घोडबंदर येथील मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू –

अमित पुहाल ( 20 )

अमन बादल ( 21 )

अजय बुंबक ( 24 )

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *