काश्मीरप्रकरणी मध्यस्थी करू की नको ? – डोनाल्ड ट्रम्प

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याची विनंती मला केली होती असे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मात्र मोदींनी अशी कुठलीही विनंती केली नसल्याचे भारताच्या परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे. आता पुन्हा एकदा राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं आहे. अमेरिकेची मध्यस्थी हवी की नको हा संपूर्ण पंतप्रधानांचा निर्णय असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प ?
काश्मीर प्रश्न मार्गी लागण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करण्याची विनंती मला केली होती.
मात्र भारताच्या परराष्ट्र खात्याने मोदींनी अशी कुठल्याही प्रकारची विनंती केली नसल्याचे म्हटलं.
त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा यासंदर्भात वक्तव्य केलं आहे.
काश्मीरप्रश्नी अमेरिकेची मध्यस्थी हवी की नको हा संपूर्ण मोदींचा निर्णय आहे.
गेल्या कित्येक काळापासून पाकिस्तान आणि भारतामध्ये काश्मीप्रश्नावरुन चर्चा सुरू आहे.
त्यामुळे मी या प्रश्नामध्ये मध्यस्थी करायची की नाही हा मोदींचा निर्णय असल्याचे म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान इम्रान खान खूप छान व्यक्तीमत्वाचे नेते आहे.
दोघांशी चर्चा झाल्यानंतर मला असं वाटत दोन्ही देशांनी चर्चा करायला हवी असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.