Sat. Apr 4th, 2020

CBSE 10th Class result : 91.1% टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) इयत्ता दहावीचे निकाल आज दुपारी घोषित करण्यात आला आहे. 91.1% टक्के सीबीएसईचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 18 लाख विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. इयत्ता 10 वी मध्ये एकूण 13 विद्यार्थ्यांनी 500 पैकी 499 गुण मिळवून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर, 24 विद्यार्थ्यांनी 500 पैकी 498 गुण मिळवले आहेत. विद्यार्थी इयत्ता १० वीचा निकाल http://cbseresults.nic.in/class10/Class10th19.htm या साइटवर पाहू शकतात.

 

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 5 टक्क्यांनी वाढली

सीबीएसई) इयत्ता दहावीचे निकाल आज दुपारी घोषित करण्यात आला आहे.

एकूण 18 लाख विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती. त्यातील  91.1%  टक्के सीबीएसईचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यातील 13 विद्यार्थ्यांनी 500 पैकी 499 गुण मिळवून अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

2018 मधील निकालापेक्षा यावर्षी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 5 टक्क्यांनी वाढली आहे.

10 वी सीबीएसई परीक्षेत नवी मुंबईची अपीजय शाळेची दिपस्ना पांडाला  497  गुण मिळाले आहेत.

ठाण्यातील न्यू हॉरीजॉन शाळेचा एड्री दास हिने  497 गुणांपर्यंत मजल मारली आहे.

ठाण्यातील रिलायन्स फाऊंडेशन शाळेची धात्री मेहताही  497 गुणांपर्यंत पोहचला आहे.

हे आहेत  13 टॉपर्सं

सिद्धांत पेंगोरिया,
दिव्यांश वाधवा,
योगेश कुमार गुप्ता,
अंकुर मिश्रा,
वत्सल वार्ष्णेय,
आर्यन झा,
इश मदन,
मान्या,
तारु जैन,
भावना एन शिवादास,
दिवजोत कौर जग्गी,
अपूर्वा जैन,
शिवानी लाठ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *