Thu. Mar 4th, 2021

जाणून घ्या.. टोमॅटोचे फायदे आणि तोटे

पदार्थाला चांगली चव येण्यासाठी टोमॅटोचा जगभरात करतात उपयोग…

प्रत्येकाच्या किचनमध्ये टोमॅटो हा असतोच टोमॅटो वापर भारतातच नाही तर जगभरात होतो. भाजी आणि अनेक खाद्यपदार्थात टोमॅटोचा उपयोग होतो. शिवाय पदार्थाला चांगली चव येण्यासाठी टोमॅटो उपयोग होतो.

बरंचदा तर बायका टोमॅटोची कूट घरात बनवून ठेवतात आणि तो कूट भाजीत टाकतात. यामुळे भाजीला चांगली चव येते. लाल – लाल असणारे टोमॅटो दिसायला फार सुंदर आणि चवीला आंबड गोड असते. पण तुम्हाला माहित आहे का की टोमॅटो नेमकं आलं कुठून ? ही मुळची वनस्पती पेरू या देशातील आहे.

ब्रिटेनने जेव्हा भारतावर राज्य केलं होतं तेव्हा त्यांनी स्वतासोबत टोमॅटो भारतात आणले होते. टोमॅटो ओळख ही 1554 च्या सुमारास झाली. इटली या देशाने प्रथमच टोमॅटोचे लागवड करण्यास आली होती. त्यानंतर अनेक देशात टोमॅटो लागवड करण्यात आली.

सुरूवातीला अनेक देशात टोमॅटोचा औषधी म्हणून वापर करत असतं मात्र फ्रेंच नागरिकांनी प्रथमच म्हणजेच 1789 साली फिलाडेल्फिय वनस्पती लागवड करून इ. स. १८०० सालापासून आहारात टोमॅटोचा वापर केला त्यानंतर अनेक देशात टोमॅटो वापर खाद्यपदार्थात करण्यात आला.

भारतात 1900 सुमारास टोमॅटो वापर खाद्यपदार्थात करण्यात आला असा अंदाज आहे. भारतात प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटोचा वापर करण्यात येतो. टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट गोड असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते.

टोमॅटो गुणधर्म : टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. टोमॅटोमध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय प्रोटीन, व्हिटॅमीन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन, ई व्हिटॅमीन आणि व्हिटॅमीन के चा खूप चांगला स्त्रोत असतो. व्हिटॅमीन के हा शरिरासाठी फायदेशीर आहे. रक्त गोठविण्याचं काम हे व्हिटॅमीन के करते. त्यामुळे स्त्रीयांसाठी हे फार उपयोगी आहे.

ही सर्व व्हिटॅमीन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. व्हिटॅमीन ए ची मात्रा असल्यानं टोमॅटो डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये मँगनीज, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, झिंक,आर्यन, फॉस्फरस, आणि कॉपर यासारखी खनिजे असते ही खनिजे शरिरासाठी फार उपयोगी असतात. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे हृदयरोगासारख्या आणि कॅन्सरसारख्या आजरापासून बचाव करण्यासाठी सहायक ठरते.

टोमॅटो फायदे (Benefits Of Tomato)

1 टोमॅटो रोज खाल्यानं वजन कमी होते

2 हाडांच्या बळकटीसाठी टोमॅटो फार उपयोगी पडते.

3 डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी टोमॅटो उपयोगी ठरते.

4 टोमॅटोचा ज्यूस पिल्यानं शरीराला उर्जा मिळते.

5 टोमॅटोचं सेवन हाय बीपीने त्रस्त असलेल्या लोकांसाठीही फायदेशीर आहे.

6 मानसिक आणि शारीरिक विकासाठी टोमॅटो उपयोग होतो.

7 हृदयरोगांमध्येही टोमॅटो ज्यूसचं सेवन करण फार गुणकारी असतो.

8 टोमॅटो फॅट्सही वाढत नाहीत.

9 टोमॅटोमुळे डोळ्यांना होणारा रांताधळेपणाही कमी होतो.

10 लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास सकाळी रिकाम्या पोटी काळीमिरी घालून टोमॅटो ज्यूसमध्ये पिल्यास फायदा होतो.

11 टोमॅटोमध्ये लायकोपीन भरपूर प्रमाणात आढळते त्यामुळे कॅन्सर रोखण्यास फायदेशीर ठरते.

12 टोमॅटोमध्ये पाणी आणि फायबरची मात्रा जास्त असते. त्यामुळे पोट लवकर भरतं आणि फॅट्सही वाढत नाहीत.

टोमॅटोचे तोटे (Side Effects Of Tomato)

1 टोमॅटोच्या बियांमुले किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.

2 टोमॅटोमध्ये जास्त सेवन केल्यानं अॅसिडीटी होऊ शकते.

3 टोमॅटोच्या जास्त सेवन केल्यानं पोटात दुखणे आणि गॅसचा त्रासही होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *