राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ३९ वर

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ३९ वर जाऊन पोहचली आहे. विदर्भातील यवतमाळ इथं १ आणि नवी मुंबई येथं १ असे २ रुग्ण सापडल्याने हा आकडा ३९ वर पोहचला आहे.
तसेच देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १२५ वर जाऊन ठेपला आहे.
याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात एकूण १०८ जणांना विलगिकरण कक्षात दाखल केलेले आहे. एकूण १ हजार ६३ जणांना क्वारंटाईन आहे. यापैकी ४४२ जणांवर १४ दिवस पाठपुरावा घेण्यात आला आहे.
शहरनिहाय कोरोना रुग्णांची संख्या
पिपंरी चिंचवड – ९
पुणे – ७
मुंबई – ६
नागपूर – ४
यवतमाळ – ३
कल्याण – ३
नवी मुंबई – ३
रायगड, ठाणे, अहमदनगर आणि औरंगाबाद शहरात प्रत्येकी १ रुग्ण
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. राज्यातील प्रसिद्ध मंदिरंदेखील बंद ठेण्यात आली आहेत.