मंदीदरम्यानही खंडोबा यात्रेत गाढवांचा विक्रीतील उलाढाल वाढली

पूर्वीच्या काळात कुंभार, वलठी, कैकाडी समातील व्यापारी दळण वळणाचे साधन म्हणून गाढवांचा वापर मोठ्या प्रमाणात करत असे मात्र आता यंत्रयुग सुरु झालाय. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेली उपकरण, अवजारांचा वापर करण्याकडे अनेकांचा कल वाढलाय. हे जरी सत्य असले तरी या यंत्र युगात ओझे वाहणाऱ्या गाढवाची किंमत काही कमी झाली नाहीये. या गाढवांना सोन्याचा भाव आलाय. नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माळेगाव येथील यात्रेत गाढवांचा मोठा बाजार भरतो. यंदाही गाढवांच्या खरेदी विक्रीत चांगली उलाढाल झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
माळेगाव यात्रेत गाढवांचा मोठा बाजार भरतो. कर्नाटक, आंध्रप्रदेशातून अनेकजण खरेदी विक्रीसाठी येतात. यंदा गाढवांची जोडी 15 हजार ते 35 हजारापर्यंत विकली जातेय. वर्षानुवर्षे यात्रेत येणारे गाढवांचे व्यावसायिक यंदा व्यवसाय चांगला झाल्याने आनंदीत असल्याचे सांगतात. पूर्वीपेक्षा गाढवांच्या किंमती वाढल्याने उलाढाल चांगली होत आहे.
गाढवांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे जुने लोक या व्यवसायात नफा चांगला मिळतो मागणी आणि दर ही चांगला मिळत असल्याने आनंदी आहेत.
मात्र, नविन पिढी या व्यवसायात यायला तयार नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
गाढवांच्या व्यवसायाला सुवर्णकाळ आला. मात्र, नविन पिढी यात रस घेत नसल्याची चिंता व्यक्त होतेय.