सिंदिया आणि बंडाची परंपरा

ज्योतिरादित्य सिंदिया यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपची वाट धरली आहे, त्यामुळं पुन्हा एकदा सिंदिया आणि बंडाची परंपरा याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे.
ज्योतिरादित्य सिंदिया यांचे वडील आणि त्यांची आजी यांनीही काँग्रेस पक्ष सोडला होता.
28 वर्षापूर्वी ज्योतिरादित्य सिंदिया यांचे वडील माधवराव सिंदीया यांनी 1993 साली काँग्रेस सोडचिट्ठी दिली होती.
1993 साली दिग्विजय सिंग सरकार पडले होते
माधवराव सिंदीया यांच्या 75 व्या जयंतीला त्यांचा मुलगा ज्योतिरादित्य सिदींया यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय
1967 साली डी पी मिश्रा यांचे सरकार होते, यावेळी ज्योतिरादित्य सिंदिया यांची आजी राजमाता विजयराजे सिंदिया यांनी काँग्रेस सोडली होती