Mon. Oct 25th, 2021

त्र्यंबकेश्वरमध्ये कार बुडून बाप-लेकाचा दुदैवी मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये बिल्वतीर्थ तलावात कार बुडून बापलेकाचा मृत्यू झाला. पण कार चालवणारा एक मुलगा मात्र वाचला. निल पर्वताच्या मागे असलेल्या तलावात ही घटना घडली. सुरेश भांगरे आणि सुरज भांगरे या बाप लेकाचा यात मृत्यू झाला.

 

सुरेश भांगरे आपल्या दोन्ही मुलांसह निल पर्वतच्या मागे असलेल्या परिसरात फिरायला गेले होते. पण तलावाच्या दिशेनं येत असताना वळणावर गाडी थेट तलावात उतरली. विशाल गाडी चालवत असल्यानं तिथली काच उघडी होती. स्थानिकांच्या सहाय्यानं त्याला वाचवण्यात आलं. पण बाप लेक मात्र वाचू शकले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *