अहो आश्चर्यम्! ‘या’ पुरुषाने दिला बाळाला जन्म!

पुरूष गर्भवती होणं ही खरंतर अशक्य कोटीतील बाब आहे. मात्र अमेरिकेमध्ये एका पुरुषाने चक्क बाळाला जन्म दिलाय. वायली सिम्सन असं या ट्रान्सजेंडर पुरुषाचं नाव आहे. तो आधी स्त्री होता आणि काही महिन्यांपूर्वीच त्याने सर्जरीद्वारे लिंगबदल केला होता.
पुरूष कसा काय देऊ शकतो बाळाला जन्म?
वायली सिम्सन हा आधी स्त्री होता.
त्याचं वय सध्या 28 आहे.
पण वयाच्या 21 वर्षापर्यंत तो स्त्री होता.
त्या वयात त्याची पुरूष बनण्याची शारीरिक प्रक्रिया सुरू झाली.
मासिक पाळी बंद झाली.
यापुढे ती गर्भधारण करू शकत नाही, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.
त्यानंतर सर्जरीद्वारे त्यांनी लिंगबदल केला.
टेक्सासमध्ये स्टीवन गेथ या पार्टनरबरोबर राहत असताना अचानक फेब्रुवारी 2018 साली त्याला गर्भधारणा झाली.
या गोष्टीने सर्वांनाच धक्का बसला.
पुरुष झाल्यावरही गर्भधारणा कशी झाली, याचं त्याला स्वतःलाही आश्चर्य वाटलं.
लिंगबदल करूनही तू पुरूष झालाच नाहीस आणि कधी होऊ शकत नाही, अशा शब्दांत लोकांनी टीका केली.
पुरूष कधीही बाळ जन्माला घालू शकत नाही, मात्र तरीही आपण बाळाला जन्म द्यायचाच, असा निर्णय सिम्सनने घेतला.
हा निर्णय अतिशय घातक असल्याचं त्याला सांगण्यात आलं, मात्र वायली आपल्या निर्णयावर ठाम होता.
अखेर सिझेरियन पद्धतीने वायलीने आपल्या बाळाला जन्म दिलाय. बाळाचं नाव रोवेन ठेवण्यात आलंय.