Mon. Jan 24th, 2022

काळ आला होता पण वेळ नाही, 300 फूट खोल दरीतून दोघांना बाहेर काढण्यात यश

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

काळ आला होता पण वेळ नाही. पाचशे फूट खोल मृत्यूच्या दरीतून त्या दोघांना जीवदान मिळालं. अगदी सिनेमातल्या कथेप्रमाणे ही घटना घड़लीय ती नेरळजवळच्या पेब किल्ल्यावर पाच तासांच्या थरारक ऑपरेशननंतर पेब किल्ल्यावरुन दोघांना वाचवण्यात यश आलं.

 

9 जुलैला मुंबईचा 30 जणांचा एक ग्रुप पेबवर ट्रेकिंगसाठी आला होता. नेरळ फणसवाडी या धोकादायक मार्गानं त्यांनी पेब किल्ल्याची चढाई केली. माथेरानकडच्या रस्त्यानं ते पेब किल्ला उतरत होते. अर्धी वाट पार केल्यानंतर या ग्रुपमधल्या 21 वर्षांच्या रिया शाहचा पाय घसरला.

 

ट्रेकचा लीडर हर्षल व्होरानं तीचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. पण रियासोबत हर्षलही 500 फूट खोल दरीत कोसळला. व्हॉटस एप ग्रुपवर ही बातमी पसरल्यानंतर यंत्रणा कामाला लागली. मग पुढे आला तो यशवंती हायकर्स हा ट्रेकर्सचा ग्रुप.. मृत्यूच्या खोल दरीत हे ट्रेकर्स उतरले.

 

आधीच धोकादायक त्यात पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटेवर कसरत करत ही टीम 300 फूट खोल दरीत उतरली. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर हर्षल व्होराला बाहेर काढण्यात यश आलं. त्यानंतर मग रिया शाहलाही बाहेर काढण्यात यश आलं.

 

बांबूच्या काठ्यांची डोली करुन करुन त्यांना माथेरानच्या मिनी ट्रॅकवर आणण्यात आलं. अक्षरक्ष तीन किलोमीटरंच अंतर हायकर्सनी या दोघांना खांद्यावर घेऊन पार केलं. हर्षल व्होराचा उजवा पाय मोडला.

 

तर रियाला वाचवताना यशवंती हायकर्सच्या ट्रेकर्सनाही जखमा झाल्या आहेत. यशवंती हायकर्स चे गुरुनाथ साठलेकर, धर्मेंद्र रावळ, शेखर जांभळे, दर्श अभाणी, महेश जांभळे,तसंच गणेश पवार, अजय गायकवाड या जिगरबाजांनी या दोघांचे प्राण वाचवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *