वॉशिंग्टन कॅपिटॉल इमारतीत तोडफोड

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत पराभव झाल्यामुळे ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेत धुडगूस घालून हिंसाचार केला आहे. ट्रम्प यांच्या समर्थकांनी पराभव न स्वीकारता वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून तोडफोड करण्यास सुरुवात केली आहे. या हिंसाचाराने आक्रमक स्वरूपाचे रूप धारण केले आहे. आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठया प्रमाणात झटापट होऊन या आंदोलनामध्ये एका आंदोनकर्त्याचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबर पासून सुरु असलेल्या निवडणुकीचा निकाल हा अजूनही निश्चित झालेला नाही त्यामुळे हे आंदोलन अजून आक्रमक रूप धारण करण्याची शक्यता आहे. निवडणुका सुरु होण्याच्या काळापासून ट्रम्प यांनी आपण राष्ट्राध्यक्ष पदी परत निवडून येऊ हा विश्वास दाखवला होता परंतु निवडणुकीनंतर त्यांचा परिणाम हा उलट दिसून आला आहे. या सर्वांचा परिणाम हा अमेरिकन नागरिकांवर होण्याची शक्यता आहे.