Wed. Sep 23rd, 2020

‘फ्री काश्मीर’च्या फलकामागचं ‘तिचं’ सत्य

जे एन यू विद्यापीठात झालेल्या हल्ल्याचा विरोध करण्यासाठी ‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळ करण्यात आलेल्या आंदोलनात ‘फ्री काश्मीर’चा फलक झळकला आणि त्यावरून वादाचं मोहळ उठलं. या आंदोलनात एका मुलीच्या हातात ‘फ्री काश्मीर’चा बोर्ड होता. याच मुद्द्यावरून वादंग माजला. हा बोर्ड धरणाऱ्या मेहक मिर्झाप्रभू या मुलीने आता व्हिडिओद्वारे आपली बाजू स्पष्ट केली आहे.

काय होतं ‘Free Kashmir’ बोर्डामागचं सत्य?

मेहक मिर्झाप्रभू या मुलीने JNU मध्ये झालेल्या हल्ल्य़ाविरोधात झालेल्या आंदोलनात सोमवारी सहभाग घेतला होता.

या मुलीच्या हातात ‘ फ्री काश्मीर ‘ चा फलक होता.

या संदर्भात मेहक म्हणाली की, मी मूळची मंबईचीच आहे.

माझा जन्म मुंबईचा आहे. मी काश्मीरी नाही.

त्या ठिकाणी ‘Free Kashmir’चा फलक पडला होता, जो मी उचलला.

ज्यावेळी मी फलक हातात घेतला, त्यावेळी माझ्या मनात वेगळा विचार होता.

जसं बाकी ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य आहे, तसंच स्वातंत्र्य काश्मीरमधल्या लोकांनाही मिळावं ते लोक ही माणसंच आहेत. हाच विचार माझ्या मनात होता.

काश्मीर वेगळा करा असा मला अजिबात सुचवायचं नव्हतं.

मी धरलेल्या फलकाचा जो चुकीचा अर्थ लावला गेला आहे तो खूपच गोंधळ तयार करणारा आहे.

आपण काश्मीर लोकांना आपलं मानतो, मग तशी वागणूक का देत नाही असा विचार करून मी तो फलक हातात घेतला.

‘Free Kashmir’ फलकावरून वाद

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधलं होतं.

गेट वे ऑफ इंडिया येथे JNU प्रकरणी झालेल्या आंदोलनात भारत विरोधी नारे देण्यात आल्याचा आरोप करत आणि ‘फ्री काश्मीर’ची पोस्टर झळकावण्यात आल्याबद्दल माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी JNU विरोधातील आंदोलनात भाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *