Thu. May 19th, 2022

पेपरफुटीप्रकरणी तुकाराम सुपे निलंबित

टीईटी परिक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना शिक्षण विभागाने निलंबित केले आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे सायबर सेलने तुकाराम सुपे यांना अटक केली होती. त्यामुळे सुपे यांचे निलंबन हे त्यांच्या अटकेच्या दिनांकापासून असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

शालेय शिक्षण विभागाने तुकाराम सुपे यांचा निलंबनाचा आदेश काढला आहे. या आदेशांमध्ये काही सुपेंवर काही अटी घालण्यात आल्या आहेत. तुकाराम सुपे यांना खाजगी नोकरी आणि व्यवसाय करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जर सुपे यांनी खाजगी नोकरी किंवा व्यवसाय केल्यास त्यांना दोषी ठरवून कारवाईस पात्र ठरतील, असे आदेशांत सांगण्यात आले आहे. तसेच तुकाराम सुपे यांना शासनाच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

टीईटी पेपरफुटीप्रकरणी तुकाराम सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सुपे यांच्या घराचा तपास घेतला असता, त्यांच्या घरातून पोलिसांनी दोन कोटीहून अधिक रक्कम आणि सोन्यांची दागिने हस्तगत केली आहेत. तसेच आता याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.