Thu. Dec 2nd, 2021

रोहित पवार यांच्या ‘Valentine’s Day’च्या भन्नाट शुभेच्छा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार सक्षम तरुण नेतृत्व म्हणून लोकप्रिय आहेत. रोहित पवार यांनी Twitter वर व्हॅलेंटाईन डे निमित्त केलेलं ट्विट सध्या चर्चेचा विषय बनलंय.

तरुण आमदारांप्रमाणे व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देताना त्यात एक रोमँटिक टिप तर रोहित पवार यांनी दिली आहेच, मात्र त्याचसोबत राजकीय वळणही अतिशय सहजपणे देत समस्येबद्दल रोषही त्यातून व्यक्त होतोय. आपल्या Tweet मधून रोहित पवार यांनी गॅस सिलिंडरच्या भाववाढीवर निशाणा साधलाय.

प्रेमिकांना आपल्या प्रिय व्यक्तीसाठी एकीकडे त्यांनी स्वयंपाक बनवण्याची रोमँटिक टीपही दिली आहे. मात्र त्याचवेळी गॅस सिलिंडरच्या भाववाढीचीही आठवण करून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *