Mon. Nov 18th, 2019

दाभोळ समुद्रात आढळल्या दोन संशयित बोटी, 38 खलाशी ताब्यात

रत्नागिरीतील दाभोळ समुद्रात दोन संशयित बोटी आढळून आल्या आहेत. याने एकच खळबळ उडाली आहे.या बोटी चीन आणि इंडोनेशियाच्या असल्याचे समजते आहे. यामध्ये 38 खलाशांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या बोटी दाभोळच्या समुद्रात कशासाठी आल्या होत्या? त्यांनी सॅटेलाईट फोनचा वापर का केला होता? या सगळ्याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

दाभोळ समुद्रात आढळल्या दोन संशयित बोटी

काही दिवसांपुर्वी पालघर समुद्र किनारी संशयास्पद बोटी आढळल्या होत्या.

या घटनेचा काही तपास लागायच्या आधी रत्नागिरीतील दाभोळ समुद्रात दोन संशयित बोटी आढळून आल्या आहेत.

याने दाभोऴ परीसरात एकच खळबळ उडाली आहे. या बोटी चीन आणि इंडोनेशियाच्या  असल्याचे समजते आहे.

या बोटीमधल्या एका बोटीने सॅटेलाईट फोनचा वापर केला असून याबद्द्लची सर्वप्रथम माहिती कोस्टगार्डला मिळाली.

या कोस्टगार्डलाने ही माहिती त्वरीत  दाभोळ पोलीसांना दिली. दाभोळ पोलीसांनी तातडीने दोन्ही बोटींची तपासणी केली असून  बोटीवरील सॅटेलाईट फोन ताब्यात घेण्यात आले आहे.

या बोटीवरील 38 खलाशांना पोलीसांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. बोटींवरील कागदपत्रांची देखील तपासणी करण्यात येत आहे.या बोटींवरील काही जणांचं पासपोर्ट देखील संपलेला आहेत.

या बोटी दाभोळच्या समुद्रात कशासाठी आल्या होत्या? त्यांनी सॅटेलाईट फोनचा वापर का केला होता? या सगळ्याची चौकशी सध्या कोस्टगार्ड आणि दाभोळ पोलीसांकडून सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *