Wed. Oct 27th, 2021

माजी नगरसेवकाच्या घरावर दोन अज्ञातांचा गोळीबार

राजकारणी नेत्यांवर हल्ला होण्याच्या घटना नेहमी घडत असतात. या घटनेतील काही गुन्हेगार हे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तर काही गुन्हेगार अजुनही फरार आहेत. दरम्यान नुकताच एका नगरसेवकावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

मालेगाव शहरातील एका माजी नगरसेवकाच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केला आहे. शहरातील मोसम पूल परिसरात महेश नगर या दाट वस्तीत ही घटना घडली. काही अज्ञात इसमांनी माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावर रात्री 2 वाजेच्या सुमारास गोळीबार केला.

रिजवान खान व त्यांची पत्नी हे दोघेही माजी नगरसेवक असून ते मालेगावातील महाविद्यालयात शिक्षक आहेत. या घटनेत दोन आरोपींनी जवळपास सात ते आठ गोळ्या झाडल्या असल्याचे त्यांना लक्षात आले.

दोघे बंदुकधारी यांनी गेटवरून उडी मारून त्यांच्या घराची बेल वाजवली. रिजवान खान यांनी आतील दरवाजा उघडताच त्यांच्या पत्नीच्या लक्षात आल्याने त्यांनी दरवाजा उघडू दिला नाही.

त्यामुळे आलेल्या आरोपींनी गोळ्या झाडायला सुरूवात केली. घराच्या चारही बाजूला सहा ते सात गोळ्या झाडून दरवाजाही तोडण्याचा प्रयत्न केला. रिजवान खान यांनी शेजारच्या घरी फोन करून हा प्रकार सांगताच त्यांनी लगेचच पोलिसांना याची माहीती दिली.

त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांच्या गाडीचा आवाज येताच या दोघेही बंदुकधाऱ्यांनी पलायन केले. या घटनेवरून शहरात पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या घडनेचा व्हिडिओ CCTVमध्ये कैद झाला आहे. गेल्या महिन्याभरातील दोन खुन आणि चार वेळेस गोळीबाराच्या घटनांनी मालेगावातील पोलीस यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

शहरात अवैध धंदे पुन्हा एकदा जोमाने सुरू झाल्याने गुन्हेगारांनी आपले डोके वर काढले. असे गत आठवड्यातील घटनांनी आणि खुद्द विशेष पोलीस पथकाने केलेल्या कारवाईने अधोरेखित केले आहे. त्यामुळे शहरात पोलिस नेमक्या कोणत्या दिशेने जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *