Sat. May 15th, 2021

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी! उदयनराजे म्हणतात…

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’, (Aaj ke Shivaji Narendra Modi book) या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झालाय. विरोधकांपासून ते शिवप्रेमींपर्यंत सर्वजण या पुस्तकाचा निषेध करत आहेत. अशावेळी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी पार्टीतून भाजपमध्ये आलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले हे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वंचं लक्ष आहे.

मात्र छत्रपती उदयनराजे यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला.

ऑफ द रेकॉर्ड काय म्हणाले उदयनराजे?

या पुस्तकासंदर्भात मी सविस्तर माहिती घेईन, कोण काय बोलतंय हे पाहतो.

त्यानंतर माझी भूमिका माध्यमांसमोर लवकरच स्पष्ट करेन…

मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे सर्वजण वागले, तर देशात सध्याची जी काय परिस्थिती आहे, जी अराजकता आहे ती राहणार नाही. अशी सावध प्रतिक्रिया उदयनराजे यांनी घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील पत्रकार परिषद घेऊन भाजपने ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक मागे घ्यावं अशी मागणी केली. त्येवळीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *