Wed. Apr 14th, 2021

शिवाजी महारांजांचा पुतळा हटवणं संतापजनक – उदयनराजे भोसले

मध्य प्रदेशमध्ये बुधवारी मध्य रात्री शिवाजी महाराजांचा पुतळ जेसीबीने पाडण्यात आला. याबाबत माहिती मिळताच मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयन राजेंनी संताप व्यक्त केला आहे.

त्यांनी याबद्दल ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले उदयनराजे ?

संपूर्ण देशाचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील स्मारक JCB ने काढण्यात आलं.

ज्याप्रकारे स्मारक हलवण्यात आले तो प्रकार अतिशय संतापजनक आणि निंदनीय असल्याचं उदयनराजे आपल्या ट्विटद्वारे म्हणाले.

तसेच उदयनराजेंनी  या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

मावळ्याचे मानले आभार

उदयनराजेंनी  मध्यप्रदेशमधील मावळ्यांचे आभार मानले आहेत. शिवाजी महाराजांचं समारक काढल्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवप्रेमींनी महाराजांच स्मारक तिथेच उभं केलं.

यासाठी उदयनराजेंनी या मावळ्यांचे आभार मानले.

नक्की प्रकरण काय ?  

मध्यप्रदेशातील छिंडवाडा येथे वाहतुकीला अडथळा ठरत असल्याच्या कारणाने अर्धपुतळा चौथरा हटवण्यात आला होता. शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने काढण्यात आला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओही व्हायरल होत आहे.

दरम्यान छत्रपती संभाजीराजे यांनीही या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

अधिक वाचा : …म्हणून छत्रपती संभाजीराजे संतापले, कांँग्रेसकडे मागितला खुलासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *