Wed. Nov 25th, 2020

आमच्यातील संघर्ष संपलाय- उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या 53 व्या वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं.  संघर्ष आणि कसोटीच्या वेळी मला बाळासाहेबांची आठवण येत नाही कारण त्यांनी मला तुमच्या सारखी संघर्ष करणारे शिवसैनिक दिले, मात्र आजच्यासारख्या आनंदाच्या वेळी मला बाळासाहेब, माँसाहेब आणि सगळ्या जुन्या शिवसैनिकांची आठवण येते; असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांना विचारलं आणि ते क्षणात कार्यक्रमला यायला तयार आले, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

शिवसैनिक एक वेगळं रसायन आहे. प्रेम केलं तर खूप करेल, लढ म्हटलं की असा लढेल की विचारायची सोय नाही.

शिवसेना आणि भाजपमध्ये काही काळ संघर्ष होता. मात्र आता संघर्ष संपला आहे.  आज जे व्यासपीठावर आहे हे खरं आहे. अशी युती दुसऱ्या कोण्या पक्षाची होत असेल असं नाही. आपाला वाद हा काही तुझं-माझं करण्यासाठी नव्हता, तर मूलभूत प्रश्नांवरून होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी जातीने त्यात लक्ष घालून प्रश्न सोडवले याबद्दल तुमचे आभार, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

युती मजबूत आहे. आपण भांडतानाही हेडलाईन होते आणि एकत्र आल्यावरही हेडलाईन होते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राम मंदिर होणारच!

मला स्वतःला विश्वास आहे की राम मंदिर होणार आहे.

कोल्हापूरचे दोन्ही युतीचेच खासदार आले.

ज्यावेळेला युती केली त्या सगळ्याचे विचार करून युती केली आहे.

शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं, की जो कर्माने मारणार आहे त्याला धर्माने मारू नको.

सावरकरांना डरपोक म्हणणाऱ्यांचा पराभव झाला!

सावरकरांना डरपोक म्हणणाऱ्यांचा पराभव झाला, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली. 370 कलम काढू देणार नाही, असं म्हणणाऱ्यांची हार झाली.  आम्ही 370 कलम काढणार म्हणजे काढणार, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

वंदे मातरम् म्हणायची लाज का वाटते?

ओवेसी आपण या देशाचे समान भागीदार आहोत, असं म्हणतात. असं असेल, तर त्यांना ‘वंदे मातरम्’ बोलायला लाज का वाटते? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

निवडणुका जिंकल्यानंतर मोठ्या मनाने कौतुक करण्याऐवजी हिंदूंच्या डोक्यात गडबड झाल्याचं विधान ओवैसी यांनी केलंय, असं उद्धव यांनी म्हटलं.

एका युतीची पुढची गोष्ट!

शिवसेनेच्या व्यासपीठावर मी माझ्या मित्रपक्षाला आणि माझ्या वैयक्तिक मित्राला बोलवलं आहे. मधल्या काळात आलेला दुरावा नाहीसा झालाय. लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपचे खासदार ही भेटायला आले. दोन्ही मन जुळलेली आहेत. आता एका युतीची पुढची गोष्ट पाहा असं ठाकरे म्हणाले. जसं आम्ही तुम्हाला आमंत्रित केलं, तसं कधीतरी तुम्ही आम्हाला आमंत्रित करा, असं सूचवतानाच ‘सगळं सम समान पाहिजे’ असा मुख्यमंत्रीपदावरून टोमणाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. मात्र लगेचच आपण कार्यक्रमाबद्दल बोलत आहोत, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *