Sat. Aug 13th, 2022

रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्राणज्योत अखेर मालवली. वयाच्या ९८व्या वर्षी श्वसनाचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल केले होते. तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अभिनेते दिलीप कुमार यांचे पार्थिव त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी अंत्यार्शनासाठी आणण्यात आले होते. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्या व्यतिरिक्त अनेक चाहत्यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच परिवाराला धीर दिला. भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, ‘रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला’ , या शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपली वेदना व्यक्त केली. अजरामर भूमिका साकारणारे दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील असेही मुख्यमंत्री म्हणाले. तर, दिलीप कुमार आणि आपले जुने जिव्हाळ्याचे संबंध होते असे सांगून शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.