Sat. Sep 18th, 2021

राम मंदिर उभारणीसाठी शिवसेनेतर्फे 1 कोटी रुपये, अयोध्येत उद्धव ठाकरे यांची घोषणा

अयोध्या दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे राममंदिराच्या उभारणीसाठी 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. अयोध्येमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. ‘आपण रामलल्लाकडे काय मागता?’ या प्रश्नावर उत्तर देताना ‘मी श्रीरामाकडे काय मागू? रामाने मला न मागताच सगळं दिलं’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसंच महाराष्ट्रातून अयोध्येला दर्शनासाठी येणाऱ्या लोकांसाठी ‘महाराष्ट्र सदन’ बांधण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *