Mon. Sep 28th, 2020

शिवसेना आणि भाजपा आता मनाने एकत्र आलेत – उद्धव ठाकरे

आमच्यामध्ये मतभेद होते पण आमचे विचार, नेता आणि ध्येय एकच आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे आता मनाने एकत्र आले आहेत.दोन्ही पक्षांच्या विचारधारा एकच असल्याने आम्ही एकत्र आलो आहे. असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गांधीनगरमध्ये व्यक्त केलं आहे.भाजपाध्यक्ष अमित शाह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्याआधी शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अमित शाह यांच्या रोड शोला सुरुवात करण्यात आली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

अमित शहा यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण येथे आल्याचे त्यांनी सांगितले.

आपण येथे आल्याने काही लोकांच्या पोटात दुखत आहे. या पोटदुखीचा इलाज आमच्याकडे आहे.

अमित शहा आपल्याला भेटायला आले. आमच्यात चर्चा झाली आणि दोन्ही पक्षातील मतभेद दूर झाले.

आमचे विचार, नेता आणि एकच ध्येय असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

हिंदुत्त्व आपला श्वास आहे आणि तो थांबला तर जगायचं कसं ? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.

बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊनच मी अमित शहांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो, असेही ठाकरे म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *