Fri. Feb 21st, 2020

“ते थोरात, तर आम्ही जोरात”, उद्धव ठाकरेंची टीका

स्वत:ला वीर बाजीप्रभूंची उपमा देणाऱ्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चागलेच झोडपून काढले आहे. नवले यांच्या प्रचारासभेसाठी संगमनेरमध्ये दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलाताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केलीय. ‘ते थोरात, तर आम्ही जोरात’ असे म्हणत ‘संगमनेरसह संपूर्ण नगर जिल्हा भगवा करणारच’ असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी संगमनेरच्या सभेत व्यक्त केला.

काय म्हणाले होते थोरात?

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वत:ला बाजीप्रभू देशपांडे यांची उपमा दिली होती.

त्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका करताना कुणाला कोणती उपमा द्यायची त्यासाठी आपण तितके समर्थ असायला पाहिजे असं म्हणाले.

वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवरायांसाठी, प्राणांची बाजी लावली होती म्हणून ते बाजीप्रभू. राजे गडावर पोहचल्यावर त्यांनी आपले प्राण सोडले. त्यांच्याशी तुम्ही स्वत:ची तुलना कशी करता? निवडणुकीच्या तोंडावर यांना वीर बाजीप्रभू आठवले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

थोरातांच्या करामती साऱ्यांनाच माहीत आहे, असं म्हणतानाच “त्यांना नाही अब्रू, तर मी बोलायला कशाला घाबरू”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“तुमचा नेता बँकॉकला पोहचला आहे, तेव्हा आता तुम्ही निर्धास्त घरी जा”, असं म्हणत त्यांनी काँग्रेस नेते थोरात यांना सणसणीत टोला लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *