Tue. Oct 27th, 2020

उद्धव ठाकरेंनी विश्वासार्हता गमावली आहे- नीतेश राणे

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी पुन्हा शिवसेनेवर टीका केलीय. उद्धव ठाकरे यांनी विश्वासार्हता गमावल्याची टीका आमदार नीतेश राणे यांनी केली आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले नीतेश राणे?

उद्धव ठाकरे यांच्या विषयी बोलण्यासारखं काहीच राहिलेले नाही.

बाळासाहेबांचा शब्द आणि बंदुकीची गोळी कधीही मागे फिरायची नाही.

मात्र त्याच्या विरुद्धच उद्धव ठाकरे वागत आहेत.

त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची विश्वासार्हता गमावलेली आहे.

उद्धव ठाकरे यांनी भाजपाची लाचारी पत्करली आहे.

याची शिक्षा महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरे यांना देईल.

 

स्वाभिमान पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार!

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मोठ्या ताकदीने लोकसभा निवडणूक लढवणार आहे.

आपला पक्ष महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाच जागा लढवणार असल्याचं राणे यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ यापूर्वीच नारायण राणे यांनी जाहीर केला आहे.

तर उर्वरित चार मतदारसंघ हे लवकरच राणे साहेब जाहीर करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *